Paneer Bhurji and Masala Pav (पनीर भुर्जी आणि मसाला पाव)

पौष्टीक आणि मसालेदार अशी पनीर भुर्जी आणि मसाला पाव रेसिपी आज आपण पाहुयात.....


पनीर भुर्जी आणि मसाला पाव

साहित्य:-

भुर्जी :
शंभर ग्रॅम पनीर,
२ ते ३ मध्यम कांदा बारीक चिरलेले,
२ ते ३ टोमाटो बारीक चिरलेले,
उकडलेले मटार आणि सीटकॉर्न अर्धी वाटी,
एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट,
हळद , लाल तिखट, मसाला , थोडी कोथिंबीर,
एक टेबल स्पून तेल,
जिरे,
चवीनुसार मीठ .

मसाला पाव:
लादी पाव,
बारीक चिरलेला कांदा,
बारीक चिरलेला टोम्याटो,
हळद, तिखट,
बटर,
बारीक चिरलेली कोथिंबीर.


कृती :-
१)तेलात आले लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे . नंतर कांदा टोमाटो टाकून परतून घ्यावे . 
२)टोम्याटो नरम झाला की त्यात पाव चमचा हळद , अर्धा चमचा लाल तिखट , अर्धा चमचा गरम मसाला आणि मटार स्वीटकॉर्न टाकून मीठ टाकावे . 
३)पनीर बारीक कुस्करून त्यात टाकावे व चांगले ढवळून वाफ काढावी . वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .



मसाला पाव:-

१)प्यान मध्ये बटर घालून त्यात कांदा आणि टोम्याटो चांगला परतून घ्या.
२)त्यात हळद, तिखट आणि कोथिंबीर टाकून एक मी परतून घ्या.
३)त्यात पाव मधून कापून मसाल्यावर ठेऊन परता त्याची घडी घालून परत वरून खालून भाजून घ्या आणि गरमा गरम पनीर भुर्जी सर्व्ह करा.

Comments