Veg Maratha ( व्हेज मराठा )
आज बघणार आहोत महाराष्ट्र स्पेशल व्हेज मराठा
व्हेज मराठा
साहित्य:-
वड्या साठी-
दिड कप बारीक चिरलेला कोबी,
एक कप किसलेले गाजर,
कोथिंबीर चिरलेली,
दोन टेबल स्पुन कॉर्नफ्लोवर,
दोन टेबल स्पुन मैदा,
अर्धा चमचा गरम मसाला,
एक चमचा हिरवी मिरची पेस्ट,
अर्धा चमचा धने पुड,
अर्धा चमचा कश्मिरी लाल तिखट,
चवी पुरता मीठ.
ग्रेव्हीच साहित्य:
दोन कांदे चिरून,
एक टोम्याटो चिरून,
चार ते पाच लसूण पाकळ्या,
अर्धा इंच आलं,
अर्धा कप किसलेलं सुक खोबर,
एक टेबल स्पुन गरम मसाला,
अर्धा चमचा धने पुड,
दोन चमचे कश्मिरी लाल तिखट,
एक चमचा तीळ,
एक चमचा खवा किंवा दोन चमचे साय किंवा क्रीम,
जिरे,
दोन सुक्या लाल मिरच्या,
मीठ चवीनुसार,
तेल.
कृती:-
१) प्यान मध्ये कांदा , लसूण आणि आलं चार तर पाच मीनीट सोनेरी रंग येई पर्यंत भाजून घ्या, त्यात टोम्याटो, खोबर, तीळ घालून आजून चार ते पाच मिनिटं परतून घ्या, सर्व मिश्रण गार होण्या साठी ठेऊन द्या. गार झाल्यावर त्याची कमीत कमी पाणी वापरून पेस्ट करून घ्या.
२) मिश्रण गार होई पर्यंत वडे करून घ्या.
वडे करण्या साठी एका भांड्यात चिरलेला कोबी, गाजर, मीठ, मसाला, कोथिंबीर, मिरची पेस्ट घालून मिक्स करून घ्या त्यात कॉर्नफ्लोवर, मैदा, मीठ, गरम मसाला घालून मिक्स करा, किंचित पाणी वापरून घट्ट गोळा करा त्याचे कटलेटच्या आकाराचे किंवा कोफत्याच्या आकाराचे वडे करून तळून घ्या.
३)प्यान मध्ये दोन चमचे तुप किंवा तेल घेऊन त्यात जिरे , सुक्या मिरच्या मोडून घालून फोडणी करून घ्या त्यात तयार केलेली पेस्ट घाला त्यात सर्व मसाले, मीठ , तिखट, खवा किंवा क्रीम घालूंन तेल सुटे पर्यंत परतून घ्या.
४) त्यात गरजे नुसार पाणी घालून एक उकळी येऊ द्या.
५) सर्व्हिंग बाउल मध्ये खाली वडे घालून वरून ग्रेव्ही घालून किंवा खाली ग्रेव्ही घालून वर वडे ठेऊन व्हेज मराठा सर्व्ह करा.

Mast ..simple method , great taste
ReplyDeleteThnx tai
Delete