Achari aalu ( आचारी आलु )

आचारी आलु


साहित्य:-
उकडलेले बटाटे ( सोलून फोडी करून )
मीठ चवीनुसार,
जिरे,
लोणच्याचा खार,
कैरीचे लोणचे ,
जिरे फोडणी साठी,
चिखत चवी नुसार,
थोडं तेल (जर लोणच्यातल असलं तर फक्त फोडणी साठी अर्धा चमचा)
कोथिंबीर.

कृती:-
प्यान मध्ये किंचित तेल घेऊन जिरे  घालून  फोडणी करून घ्यावी.
त्यात लोणच्याचा खार आणि लोणच्यातील तेल घालून लगेच बटाटे घालावे.
चवी नुसार मीठ आणि तिखट घालून नीट मिक्स करून घ्या.
थोडं कैरीच्या लोणच्याच्या फोडी घालून मिक्स करून एक वाफ येऊ द्या.
वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
टीप:-
जर लोणच्याचा खार नसेल तर लोणच मसाला वापराव आणि थोडी आमचूर पूड वापरावी.

Comments