Honey Chilli Potato (हनी चिली पोट्याटो)

आज मस्त आणि चमचमीत रेसिपी बघणार आहेत हनी चिली पोट्याटो.


हनी चिली पोट्याटो

साहित्य:-
दोन बटाटे उभे चिरून ( फ्रेंच फ्राईज सारखे )
२ ते ३ चमचे कॉर्नफ्लोवर,
तेल तळण्यासाठी,

ग्रेव्ही साठी:-
एक शिमला मिरची उभी चिरून,
२ ते ३ मी बारीक चिरून,
१ कांदा उभा चिरून व थोडी कांद्याची पात चिरून,
४ ते ५ लसूण बारीक चिरून,
२ टेबल स्पून सोया सॉस,
१ टेबल स्पून चिली सॉस,
३ टेबल स्पून टोम्याटो सॉस,
१ चमचा कॉर्नफ्लोवर पेस्ट,
मीठ चवी नुसार,
 
सजावटी साठी:-
पांढरे तीळ,
कांद्याची पात बारीक चिरून.
मध.

कृती:-
१)बटाटे सोलून उभे चिरून घ्या. दुप्पट गरम पाण्यामध्ये २  ते ३ मी ठेवा. पाण्यातून फडक्यावर काढून कोरडे करा. एक कुंड्यात बटाटे घेऊन त्यावर कॉर्नफ्लोवर घालून नीट मिक्स करून घ्या. बटाट्याला कॉर्नफ्लोवर नीट लागलं पाहिजे. 
२)हे सर्व होई पर्यंत कढइत तेल तापत ठेवा . तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात बटाटे घालून तळून घ्या.
३)एका प्यान मध्ये तेल गरम करून त्यात लसूण,कांदा, मिरची, कांद्याची पात परतून घ्या. त्यात सर्व सॉस घालून  नीट हलवा त्यात थोडे पाणी, चवी नुसार मीठ आणि कॉर्नफ्लोवर पेस्ट घालून एक उकळी येऊ द्या.
४)त्यात तळलेले फ्रेंच फ्राईज घालून मिक्स करा. प्लेट मध्ये काढून त्यावर मध घाला, पांढरे तीळ आणि कांद्याची पात घालून सर्व्ह करा.

Comments

Post a Comment