Radish Soup for weight loss (मुळ्याच सुप)

थंडी वाढलीय ना आता चला तर मग आज पाहु गरमा गरम आणि वजन कमी करण्या साठी उपयोगी मुळ्याच सुप.


मुळ्याच सुप

साहित्य:-
एक वाटी किसलेला मुळा
बटर दोन चमचे,
दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा,
दोन टेबल स्पून  टोम्याटो चिरलेले,
२ ते ३ लसूण पाकळ्या,
मीठ चवी नुसार,
मिरे पुड किंवा गरम मसाला,
सजावटी साठी कांद्याची पात चिरून.
कृती:-
१)कुकर मध्ये सर्व प्रथम बटर घालून त्यात मुळा घालून चांगला ३ ते ४ मी परतुन घ्यायचा.
२)नंतर कांदा, लसूण आणि टोम्याटो घालून आजून २ ते ३ मी परतून घ्यायचं.
३)त्यात मिरे पुड किंवा गरम मसाला घालायचं आणि दोन कप पाणी घालून दोन शिट्या करून घ्यायच्या.
४)त्यातील भाज्या बाजूला करून मिक्सर मधून पेस्ट करून ती राहिलेल्या पाण्यात घालून मीठ घालून आणखी एक कप पाणी घालून उखळून सर्व्ह करा.
किंवा
५)त्यातील भाज्यांचा चोथा बाजूला करून राहिलेल्या सुप मध्ये मीठ घालून उखळी काढा आणि कांद्याची पात घालून सर्व्ह करा.

Comments

Post a Comment