Chatpata Corn Bhel. ( कॉर्न भेळ )
कॉर्न भेळ
साहित्य:-
२ कप कॉर्न
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ छोटा टोमाटो (बारीक चिरून)
१/४ टी स्पून मिरे पावडर
१/४ टी स्पून चाट मसाला
१ छोटे लिंबू रस
१ टे स्पून बटर
फरसाण,
बारीक शेव,मी
मीठ चवीने
कृती :
मक्याचे दाणे थोडे उकडून घ्यावे. (म्हणजे कुकर मध्ये एक शिट्टी काढावी).
कांदा, टोमाटो, कोथंबीर बारीक चिरून घ्यावी.
एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा व हिरवी मिरची घालून थोडे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग त्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे, कोथंबीर, मीठ, लिंबू रस, मिरे पावडर, चाट मसाला, टोमाटो घालून मिक्स करून घ्यावे.
गरम गरम सर्व्ह केले तर छान लागते. सर्व्ह करतांना मक्याच्या दाण्यावर कांदा,फरसाण, टोमाटोने सजवावे. वरतून मिरे पावडर, चाट मसाला भूर भुरावा.
टीप:- आवडत असल्यास गोड दही घातले तरी चव छान येते.

Comments
Post a Comment