Corn Appe (कॉर्न आप्पे )

मसाला कॉर्न आप्पे



साहित्य
१(स्वीटकॉर्न पेस्ट १ वाटी (स्वीटकॉर्न दाणे मिक्सर मधून काढून पेस्ट करणे किंवा अर्धवट बारीक केले तरी चालतील)
२)१ वाटी बारीक रवा,
३)१ वाटी ताक  (दह्यात पाणी घालून घेतलं तरी चालेल)
४)मीठ,
५)आलं, जिरे, मिरची पेस्ट
६)बारीक चिरलेला कांदा (आवडतीच्या भाज्या)
७)सोडा किंवा इनो
कृती
१)एका भांड्यात ताक घेऊन त्यात रवा घाला व नीट मिक्स करून घ्या.
२)त्यात कॉर्न पेस्ट, आलं-जुरे-मिरची पेस्ट, मीठ, कांदा घालून एकसारखं हालवून घ्या.
३)मिश्रण १० मी झाकून ठेवा.
४)मिश्रणात सोडा किंवा इनो घालून हलवा आणि आप्पे पात्रात मिश्रण घालून झाकण ठेवून आप्पे दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
चटणी बरोबर सर्व्ह करा.

Comments