Instant Jilebi ( इन्स्टंट जिलेबी )
अक्षय तृतीया स्पेशल इन्स्टंट जिलेबी
जिलेबी
साहित्य:
१ कप मैदा
१ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ सपाट चमचा तुप
पाऊण कप आंबट दही
एक चिमुट बेकिंग पावडर
तेल किंवा तूप जिलेबी तळण्यासाठी
एक चिमुट पिवळा किंवा ऑरेंज रंग
साखरेचा पाक बनवण्यासाठी:
१ कप साखर
अर्धा कप पाणी
१ टी स्पून लिंबूरस
एक चिमुट पिवळा किंवा ऑरेंज कलर
कृती:
मैदा, कॉर्नफ्लोर,दही,तुप, बेकिंग पावडर आणि रंग मिक्स करून फेटून १५ मिनिट बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात साखर, पाणी एकत्र करून १० मिनिट मंद आचेवर ठेवा. मग त्यामध्ये लिंबूरस घालून मिक्स करून ग्यास बंद करून भांडे तसेच ठेवा म्हणजे साखरेचा पाक गरम राहील.
एका कढईमधे तेल किंवा तूप गरम करायला ठेवा.
जाड प्लास्टिकची पिशवी घेऊन एक कोपऱ्यात थोडीशी कापून घ्या. दोन डाव मैद्याचे मिश्रण त्यामध्ये घालून हातानी पिशवी थोडी-थोडी दाबून गरम तेल किंवा तुपामध्ये जिलेबी सोडा. जिलेबी छान पिवळ्या रंगावर तळून घ्या. तळलेली जिलेबी पाकामध्ये १-२ मिनिट ठेवून मग चाळणीवर निथळत ठेवा.
गरम गरम जिलेबी सर्व्ह करा.
Comments
Post a Comment