Ladi Pav (लादी पाव )
आज आपण पहाणार आहोत लॉकडाऊन स्पेशल होममेड लादी पाव
लादीपाव रेसिपी
साहित्य:
३ कप मैदा
३ टिस्पून ड्राय यिस्ट
दिड टिस्पून साखर
१ टिस्पून मिठ
४ टेस्पून तेल
दिड ते पावणेदोन कप कोमट पाणी
२ टेस्पून दुध
3 टी स्पून बटर
कृती:
१) एका लहान वाटीत १/२ कप कोमट पाणी घ्या. पाणी खुप गरम नसावे आणि अगदी कोमटही नको. पाण्यात दिड टिस्पून साखर घालावी. थोडे हलवून ड्राय यिस्ट घालून मिक्स करावे. यिस्ट ऍक्टिव्ह होण्यासाठी ५ ते १० मिनीटे गरम ठिकाणी झाकून ठेवावे. १० मिनीटांनी जर मिश्रण फेसाळले असेल तर समजावे कि यिस्ट ऍक्टिव्ह झालय.
२) मोठ्या भांड्यात ३ कप पिठ, यिस्टचे पाणी, मिठ आणि पाणी घालून एकदम मऊसर ७ ते ८ मिनिट मळून घ्यावे. नंतर बटर घालून ७ ते ८ मिनिट मळावे. प्लेन सरफेसचा गोळा करून भांड्यात ठेवावा. वरून झाकण ठेवून एक तास उबेला ठेवावे.
३) एक तासांनी पिठाचा गोळा दुप्पट आकाराचा होईल. थोडा तेलाचा हात लावून एकदा किंचित पंच करून घ्यावे.
४) बेकिंग ट्रेला थोडा तेलाचा हात लावावा आणि किंचीत कोरडे पिठ भुरभूरावे. १० एकसमान गोळे करावे आणि एकमेकांन पासून अंतर ठेवून ठेवावे. वरून प्लास्टिकची पिशवी ठेवून पावाचे गोळे अजून फुलून येण्यासाठी १ तास झाकून ठेवावे.
५) १/२ तासाने ओव्हन ३७५ F (१८८ C) वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट होई पर्यंत पावाच्या गोळ्यांवर दुधाने हलक्या हाताने ब्रशिंग करावे. ओव्हन प्रिहीट झाल्यावर पाव २० ते २२ मिनीटांसाठी बेक करावे. ओव्हन बंद करावा, ट्रे ३ ते ४ मिनीटांनी बाहेर काढावा. कोमट झाल्यावर पाव सर्व्ह करावा.
६)कुकर किंवा पातेलीत करताना खाली मीठ पसरून घ्यावे त्यावर जाळी ठेऊन मोठ्या ग्यास वर १० मी मोठ्या आचेवर प्री हिट करू घ्या. नंतर पावाचा ट्रे आत ठेऊन वरून झाकण लावावं. १२ ते १५ मी मध्यम आचेवर ठेऊन बेक करावा.
टीप:
१) पिठ तेल घालून जितके जास्त मळाल तितका जास्त पाव मऊ आणि हलका होईल.
२) पावा ला वरून रंग येण्या साठी दुधात साखर घालून ब्रशिंग करावं आणि पावाची हाईट भांड्याच्या वर यावी.
३) कुकर मध्ये जर करणार असाल तर झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून करावा.

Comments
Post a Comment