Khari Shengadana ( खारी शेंगादाणे )


 खारी शेंगादाणे

साहित्य:-
१ वाटी शेंगादाणे सोलापुरी नाही मिळाले तर घुंगरू
मीठ चवी नुसार
२ वाटी पाणी
रेती किंवा मीठ अर्धा किलो भाजण्यासाठी

कृती:-
१) एका पातेलीत २ वाट्या पाणी आणि मीठ घालून पाणी उखळू द्या.

२) त्यात शेंगादाणे घालुन ५ मी उखळू द्या. ग्यास बंद करून त्यावर झाकण ठेवून १० मी तसाच ठेवा म्हणजे मीठ शेंगदाण्यात मुरेल.
३) पाणी काढून शेंगदाणे एक फडक्यावर पसरून २० ते २५ मी वाळु द्या.

४) एका कढईत रेती किंवा वाळु ५ मी मोठ्या आचेवर गरम करून घ्या. नंतर त्यात शेंगादाणे घालून भाजून घ्या. भाजताना सतत शेंगादाणे हलवत रहा. १० मी भाजुन घ्या. कधी कधी वेळ पण लागु शकतो.

५) शेंगादान्याचे फोलपट बोटाने निघतेका बघा जर लगेच निघाले तर चाळणीने चाळुन घ्या व थोड्यावेळाने खारी शेंगादाणे सर्व्ह करा.

Comments