Banana Chips ( केळाचे वेफर्स )

लॉकडाऊन स्पेशल केळाचे वेफर्स


केळाचे वेफर्स

साहित्य:-
कच्ची केली ६,
मीठ,
तेल.


कृती:-
१) हाताला तेल लावुन केळाचे दोन्ही बाजुचे शेंडे कापुन साल काडायच्या ने साल काढुन घ्या.
२) साल काढलेली केळी पाण्यात ठेवा म्हणजे काळी पडणार नाहीत.
३) तेल गरम करून घ्या. केळ फडक्याला पुसून डायरेक्त तेलात तळा.( मोठं केळ असेल तर अर्ध करून घ्या. जर लांब वेफर्स पाहिजे असेल तर अर्ध केलं उभाच किसा.)
४) जर डायरेक्त तेलात किसता येत नसेल तर ताटात किसून एक एक तेलात टाका.
५) वेफर्स टाकताना ग्यास मोठा ठेवा आणि टाकून झाल्यावर मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
६)तळून झाल्यावर त्यावर मीठ घालून मिक्स करा पाहिजे असेल तर तिखट पण घालून खावा.

Comments