Stuffed Tomato ( स्टफ टोम्याटो )

आज लॉकडाऊन स्पेशल सलाड रेसिपी पहाणार आहोत .......


स्टफ टोम्याटो


साहित्य :-
२ टोम्याटो,
पाव वाटी भिजवलेले जाड पोहे,
खोवलेलं खोबर पोह्यांचा निम्मं,
साखर चवी नुसार,
मीठ चवी नुसार,
काळे मिरे पुड,
थोडा लिंबाचा रस,
हिरवी मिरची बारीक चिरून चवी नुसार,
सजावटी साठी शेव, डाळींबाचे दाणे.

कृती:-
१) टोम्याटो १५ मिनिट पाण्यात ठेऊन द्या म्हणजे वरची साल मऊ होते.
२) एका कुंड्यात भिजवलेले पोहे त्यात खोबर, मीठ, साखर, मिरे पुड, लिंबु रस आणि मिरचीचे तुकडे घालून सर्व मिश्रण मिक्स करून ठेवा.
३) टोम्याटो मधोमध त्याचे चार भाग होईल असं कट करा. 
४) त्यात वर केलेले सारण नीट दाबून भरा आणि १० मी मुरण्या साठी टोम्याटो ठेवा.
५) सर्व्ह करायच्या वेळेस त्यावर शेव आणि डाळींबाचे दाणे घालुन खायला द्या.

Comments