Basic Gravy Recipes in Marathi

आज आपण बघणार आहोत, दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी करता येणाऱ्या काही सोप्या पण स्वादिष्ट ग्रेव्ही रेसिपीज.




फटाफट ग्रेवी

कांदा, लसुन, आलं, हिरवी मिरची आणि टोम्याटो बारीक करून त्यात बडीशेप पावडर, तिखट, जिरे, हिंग, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घालून शिजवा.
किंवा
कांदा उकडून पेस्ट करून त्यात वरील सगळे साहित्य घालून पण पेस्ट करता येईल.




ग्रीन ग्रेव्ही

पालक उकडून बाजूला ठेवा. त्यात परतलेला कांदा, लसूण, आलं, मिरची, टोम्याटो ची पेस्ट करा. एक प्यान मध्ये तेल घेऊन जिरे हिंग जोडणी करून त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्या त्यात त्यात उकडलेला पालक पेस्ट घालून त्यात मीठ आणि गरम मसाला घालून शिजवा.




टोम्याटो ग्रेव्ही

टोम्याटो प्युरी, तिखट, धने पावडर, बडीशेफ पूड, हळद, थोडी साखर, फ्रेश क्रीम, कसूरी मेथी, टोस्ट चा चूरा मीठ फोडनित घालून शिजवून मस्त ग्रेव्ही तयार करा.



बिना कांदा लसूण ग्रेव्ही (जैन ग्रेव्ही)
खोवलेला नारळ, भिजवलेली खसखस, आलं, मिरची, काजू पेस्ट, टोम्याटो पेस्ट एक प्यान मध्ये फोडणी करून त्यात वरील मिश्रण घालून थोडं मीठ घालून शिजवा.



व्हाईट ग्रेव्ही

भीजवलेली खसखस व काजू, बडीशेफ, वेलदोडे, लवंग आणि दूध घालून पेस्ट करून घ्या. एका प्यान मध्ये तूप घेऊन जिरे आणी दालचिनी तुकडा घालून फोडणी करा. त्यात काजू-खसखस ची ग्रेव्ही घालून शिजवा शेवटी थोडं आजून दूध घालून उकळा आणि ग्रेव्ही तयार.



दह्या ची ग्रेव्ही
दही, तिखट, हळद, धने पावडर, हिरव्या मिरची ला नीट मिक्स करून तुपाच्या फोडणीत जिरे, हिंग घालून त्यात मिश्रण टाका आणी शिजवा त्यात मीठ आणी कोथिंबीर टाका.

Comments

Post a Comment