Brown Gravy Recipe In Marathi ( ब्राऊन ग्रेव्ही रेसिपी मराठीत )
आज आपण सगळ्यात जास्त वापरला जाणारा ग्रेव्हीचा दुसरा प्रकार ब्राऊन ग्रेव्ही बघणार आहोत.
ब्राऊन ग्रेव्ही
साहित्य:
२ कप वरपर्यंत भरून उभा चिरलेला कांदा पाकळ्या आधी सोडवू नयेत.
३/४ कप तेल
दीड टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आले पेस्ट
अख्खा गरम मसाला - २ तमालपत्र, ३-४ वेलची, २-३ लवंग, १ दालचीनी तुकडा, ४-५ काळी मिरी
१ टीस्पून गरम मसाला
२ टेस्पून काजू पेस्ट
२ टेस्पून क्रीम (किंवा फेटलेली साय)
चवीपुरते मीठ
कृती:
१) कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या कराव्यात. कढईत तेल गरम करून त्यात कांदा मध्यम आचेवर तळून घ्यावा.
२) कांदा लालसर होईस्तोवर तळावा. कांदा जळू देउ नये. त्यामुळे ग्रेव्हीची चव कडसर लागते.
३) कांदा तळला की तेलातून काढावा. कढईतील २ चमचे तेल घेऊन तळलेला कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटावा. वाटताना थोडे पाणी घालून दाटसर पेस्ट करावी.
४) जर कढईत अजून तेल शिल्लक असेल तर त्या तेलात खडा गरम मसाला घालून मंद आचेवर परतावे. जर तेल कमी असेल तर ३-४ चमचे तेल घालून मग मसाले परतावे. नंतर आलेलसूण पेस्ट परतावी. नंतर कांदा पेस्ट आणि काजू पेस्ट घालून परतावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे. यामध्ये थोडे पाणी घालावे. खूप घट्ट किंवा पातळ नसावी. काजू पेस्ट तळाला चिकटू शकते म्हणून मध्येमध्ये तळापासून ढवळावे.
५) शेवटी क्रीम आणि गरम मसाला घालून आच बंद करावे.
१) छोले
साहित्य:-
१ मध्यम वाटी काबुली चणे
२ वाट्या ग्रेव्ही
चुमुट्भर साखर
अर्धा चमचा शहाजिरे
हिरव्या मिरच्या
कृती:-
चणे शिजवताना चहाची पुरचुंडी, मीठ घालून कुकर मध्ये तीन शिट्या कराव्यात. कढईत डालडा घेऊन शहाजिरे, साखर, लाल तिखट घालून ब्राऊन ग्रेव्ही परतावी. उकडलेले चणे , गरम मसाला, मीठ, हिरवी मिरच्या घालून दोन वाफा आण्याव्यत व जरुरी प्रमाणे पाणी घालावे व कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करा.
२) भेंडी फ्राय
भेंडी स्वच्छ धून पुसून घ्यावी. भेंडीला मधोमध चीर देऊन आत मीठ घालावे व डीप फ्राय करून घ्यावी. या कुरकुरीत भेंडी आयत्या वेळी ब्राऊन ग्रेव्ही मध्ये मीठ, तिखट, मसाला घालून थोडी परतून सर्व्ह करावी.
३) पालक पनीर
साहित्य:-
१ जुडी पालक
१ लहान कांदा
१ मोठा टोम्याटो
अर्धा चमचे शहाजिरे
अर्धा टी स्पून जिरे आणी हिंग
२ टि स्पून काजू आणी खसखस
२ टी स्पून खवलेला नारळ
४ लसूण पाकळ्या
आलं
३ ते ४ टि स्पून साय
कृती:-
पालक गरम पाण्यात टाकून शिजवून घ्या. पालक वरील सर्व साहित्य सोबत बारीक वाटून घ्या. थोड्या बटर मध्ये शहाजिरे, हिंग फोडणी करून घ्या. १ बारीक कांदा चिरून परता. तयार ब्राऊन ग्रेव्ही व पालक पेस्ट तूप सुटे पर्यंत परता. सर्वात शेवटी पनीर टाकून ३ ते ४ टी स्पून साय टाका व गरमा गरम सर्व्ह करा.
ब्राऊन ग्रेव्हीत कोणकोणत्या भाज्या करता येतात ते पाहु :-
मटार पनीर, भरली वांगी, मसाला भेंडी, पाटवड्या, सर्व कोफ्ता करी, मश्रुम भाज्या, कॉर्न कुर्मा, गट्टा करी, काजु करी, मेथी पनीर, मिक्स व्हेज, शाही पनीर, नवरत्न कुर्मा, कुर्मा भाजी, राजमा मसाला, तवा सब्जी, व्हेजिटेबल हंडी, व्हेज कोल्हापुरी.

Comments
Post a Comment