Red Gravy Recipe In Marathi

आज आपण बघणार आहोत रेड ग्रेव्ही ची रेसिपी आणी त्यात कोण कोणत्या भाज्या करता येतील.....

रेड ग्रेव्ही
साहित्य:-
3 मध्यम आकाराचे टोम्याटो
2 मध्यम आकाराचे कांदे
4 ती स्पून खसखस
6 टी स्पून काजू तुकडे
4 लसूण पाकळ्या
पाव इच आलं
4 टी स्पून खोबर
अर्धा टी स्पून कसुरी मेथी
कृती:-
एक चमचा डालडा घेऊन टोमॅटो, कांदा व लसूण 2 ते 3 मी परतून घ्या. नंतर बाकीचे साहित्य घालून 2 मी परता आणि मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. रेद ग्रेव्ही तयार.
हि ग्रेव्ही सर्व तिखट डिश साठी वापरतात

व्हेज पनीर टिक्का मसाला

साहित्य:-
तयार ग्रेव्ही
पाव चमचा शाही जिरे
चिमूट साखर
लाल तिखट
गरम मसाला
मीठ
कृती:-
तुपा मध्ये शाही जिरे , साखर व लाल तिखट टाकून लगेच ग्रेव्ही तूप सुटे पर्यंत परतून घ्यावी. कांदा , सिमला मिरची, टोम्याटो तुपाचा हात लावून ग्यास वर भाजून घ्या. भाजलेल्या भाज्या ग्रेव्हीत घाला, गरम मसाला, मीठ टाकून शेवटी पनीर घाला व एक वाफ आणा. सर्व्ह करताना वरून बटर घाला.

व्हेज जयपुरी
फ्लॉवर, गाजर, फरसबी, मटार यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून वाफवून घ्यावेत. रेड ग्रेव्हीत घालून परतून घ्याव्यात. चवी नुसार मीठ आणी तिखट घाला सर्वात शेवटी 2 टे स्पून दही घालून तेल सुटे पर्यंत परतावे.

व्हेज माखनवाला


रेड ग्रेव्ही बटर मध्ये परतून घ्यावी. फ्लॉवर, गाजर, फरसबी लांब कापून शिजवून घ्यावी. मीठ व तिखट मसाला चवी प्रमाणे. 2 टे स्पून फ्रेश क्रीम किंवा जाड साय घालून तेल सुटे पर्यंत परतावे व वरून तळलेले काजू घालावेत.

रेड ग्रेव्हीत आजून कोणत्या रेसिपी करता येतील त्याची लिस्ट

रेड ग्रेव्ही
मटार पनीर, पनीर मसाला, भरली वांगी, दम आलू, शेव भाजी, पाटवड्या, कोफ्ता करी, मश्रुम भाज्या, शाही पनीर, नवरत्न कुर्मा, कुर्मा भाजी,  छोले, उसळी, राजमा मसाला, दही वाली पनीर सब्जी, तवा सब्जी, व्हेजिटेबल हंडी, व्हेज कोल्हापुरी.


Comments

  1. Very nice yummy. . Good. Keep going.. For test examination, please call me anytime..

    ReplyDelete

Post a Comment