Papad Bhaji ( पापड भाजी )
आज आपण पहाणार आहोत झटपट होणारी पापड भाजी... पापड भाजी साहित्य:- १० उडदाचे पापड भाजून, १ वाटी दही, २ कांदे पेस्ट करून ( हवा असेल तर ) तेल नेहमीच्या पेक्षा थोडं जास्त, अर्धा चमचा बेसन, २ चमचे कश्मिरी लाल तिखट, १ चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, हिंग, हळद, जिरे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरून. कृती:- १) प्यान मध्ये तेल गरम करून जिरे घालू फोडणी करून घ्या. त्यात हळद, तिखट आणि धने पूड घालून मिक्स करून घ्या. २) कांदा घालणार असाल तर पेस्ट घालून २ मी चांगली परतून घ्या. ३) दही फेटून फोडणीत घाला आणि सतत ढवळत रहा नाहीतर दही फाटेल, मसाले घट्ट आणि तेल सोडायला लागल्यावर ढवळण बंद करा. ४) त्यात बेसन पीठ आणि कोथिंबीर घालून परतून घ्या. ५) त्यात पाणी घालून एक उखळी येउद्या. त्यात चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घाला. ६) ऐन वेळी पापड तुकडे करून त्यात घालून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.